

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ योजना ही महाराष्ट्र शासनाची एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेचा उद्देश मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आर्थिक सहाय्य पुरवणे आणि त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देणे आहे.
ही योजना मराठा समाजातील तरुणांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी एक महत्त्वाचा उपक्रम आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही येथे भेट देऊ शकता.
अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेचा लाभ प्राप्त करण्यासाठी अर्जदार १८ ते ४५ वयोगटातील असणे गरजेचे आहे.पुरूष अणि महिला वर्ग दोघे पात्र ठरतील योजनेसाठी अर्ज करण्यासाठी पुरूषांचे वय जास्तीत जास्त ५० असायला हवे अणि महिलांचे वय जास्तीत जास्त ५५ असायला हवे.
अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेचा लाभ प्राप्त करण्यासाठी आपले वार्षिक उत्पन्न आठ लाखापर्यंत असावे यापेक्षा अधिक असु नये.
ज्यांचे आर्थिक उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी आहे त्यांना ह्या योजनेअंतर्गत १० लाखाचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते.अणि कर्जाचे हप्ते वेळेवर फेडले तर आपणास हप्त्याच्या कर्जाची रक्कम आपल्या बॅक खात्यात डिबीटी दवारे पाठवली जाते.
आपण घेतलेल्या कर्जाची रक्कम जास्त असल्यास जवळपास तीन लाखापर्यंत व्याज रक्कमेचा परतावा ह्या योजनेअंतर्गत आपणास प्राप्त होतो.
अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेचा लाभ प्राप्त करण्यासाठी अर्ज केल्यानंतर लगेच आठवडाभरात आपल्या अर्जावर कारवाई केली जात असते.
ह्या योजनेचा लाभ घेऊन ज्यांनी स्वताचा उद्योग व्यवसाय सुरू केला आहे अशा लाभार्थी व्यक्तींनी सहा महिन्याच्या आत आपल्या उद्योग व्यवसायाचे दोन फोटो योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अपलोड करायचे आहे.
अर्जदारास योजनेचा पहिला हप्ता अनुदानाच्या स्वरूपात देण्यात येतो.पहिल्या हप्त्यामध्ये मुददल अणि व्याज देखील समाविष्ट असते.तीन लाखाच्या कर्ज योजनेवर यात १२ टक्के इतके व्याज देखील दिले जाते.
अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेअंतर्गत दिव्यांगांना चार टक्क्यांपर्यंत निधी प्रदान करण्यात येत असतो.
दिव्यांग व्यक्ती कर्जासाठी अर्ज करत असेल तर त्याने त्याचे अपंगत्व प्रमाणपत्र देखील सादर करणे आवश्यक असणार आहे.अक्षम मापदंड अंतर्गत अर्ज करत असल्यास अपंगत्व प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असणार आहे.